Eknath Khadse : अजितदादांनाही डावललं जात पण.. नाथाभाऊंनी सांगितलं महायुतीतलं पॉलिटिक्स

Eknath Khadse : अजितदादांनाही डावललं जात पण.. नाथाभाऊंनी सांगितलं महायुतीतलं पॉलिटिक्स

Eknath Khadse : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत. आताच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. अजितदादा म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून महायुती सरकारमध्ये ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार महायुतीत राहिले किंवा नाही राहिले हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसत आहे. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी, असे खडसे म्हणाले.

‘आज माझ्याकडं अर्थखातं पुढं टिकेल सांगता येत नाही’; अजितदादांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट !

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ?

सहकारी संस्थांना अर्थबळ पुरवण्याबाबत अजित पवार म्हणाले, टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच खरेदी विक्री संघासाठी गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं अर्थखातं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही.

बारामतीत 42 कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला 5 कोटी रुपये देऊन जागा घेण्यात आली. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो पण, त्यांची जागा घेताना 5 कोटी दिले असेही अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री होतो. त्यावेळीही अनेक योजनांच्या फाइल यायच्या त्यात आधी बारामतीचं नाव शोधायचो. नाव नसेल तर टाकायचं आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रुपयांचं मॅग्नेटचं काम मिळालं, असे अजित पवार म्हणाले होते.

रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते… राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube