ज्यांनी दिली साथ, त्यांचाच घात, शिंदे गट आणखी दोन उमेदवार बदलणार; आदित्य ठाकरेंची टीका
Aditya Thackeray On Shinde Shivsena : शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार बदलले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. तर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे गटावर टीका केली.
केजरीवाल, सिसोदिया ‘जायबंदी’ : पक्ष अडचणीत असताना राघव चढ्ढा कुठे गायब?
ज्यांनी साथ दिली, त्यांचाच घात केला, हे मिंधे गटाचे ब्रीदवाक्य आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ते मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते.
या सभेत बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे गटाने आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार त्यांनी बदलले आहेत. तसेत ते आणखी दोन उमेदवार बलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं ज्यांनी दिली साथ, त्यांचाच केला घात हे शिंदे गटाचे ब्रिदवाक्य आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
भाजपला ठाकरे गटाची भीती
ते म्हणाले, मला अशी माहिती मिळाली आहे की शिंदे गटासह भाजपही उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे. भाजपला शिवसेनेची (उद्धव ठाकरे गटाची) भीती वाटते. त्यामुळे भाजपने मुंबईत सहापैकी फक्त दोनच उमेदवार जाहीर केले आहेत, भाजप ईशान्य मुंबईचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अडीच वर्षांत राज्यातील उद्योग गुजरातला वळवले
मुंबईतील सहा जागांच्या निकालावर संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागून आहे. आज देशात मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या अडीच वर्षांत राज्यात येणारे मोठे उद्योग गुजरातकडे वळवण्यात आले, अशी टीका त्यांनी महायुती सरकावर केली.