आता कुठं जाणार गद्दारांनो? लोकसभा फक्त ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील; ठाकरे गटाची टीका

आता कुठं जाणार गद्दारांनो? लोकसभा फक्त ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील; ठाकरे गटाची टीका

Ambadas Danve On Bhavana Gawali : शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटी (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली होता. मात्र, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं शिंदे गटाला पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी जाहीर झाली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आला. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) टीकास्त्र डागलं.

‘…तरीही उमेदवारी अर्ज दाखल करणार, दावेदारी सोडली नाही’, तिकीट कापल्यानंतर भावना गवळी आक्रमक 

जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी, असा खोचक टोला दानवेंनी लगावला.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला एक दिवस बाकी असतांना हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली. तर खासदार भावना गवळींचाही पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या घडामोडींनतर अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत, असं म्हटलं.

भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला 

पुढं लिहिलं की, जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव साहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे…. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवती, असं खोचक ट्विट दानवेंनी केलं.

दरम्यान, भावना गवळींनी उमेदवारी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. त्यांनी उमेदवारी संदर्भात फडणवीसांशी चर्चा केली होती. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. मात्र, शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमदेवारी दिली. त्यामुळं भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. आता यवतमाळ-वाशीममधून ठाकरे गटाने संजय देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशी लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube