हिंगोलीचा वाद पेटला! हेमंत पाटील समर्थकांचा ठिय्या; CM शिंदे म्हणतात, हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही

हिंगोलीचा वाद पेटला! हेमंत पाटील समर्थकांचा ठिय्या; CM शिंदे म्हणतात, हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही

Eknath Shinde on Hingoli Lok Sabha Constituency : महायुतीत हिंगोली मतदारसंघावरून चांगलीच तणातणी निर्माण झाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून प्रचंड विरोध झाला. त्यानंतर उमेदवारी बदलण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला गेला. यानंतर हेमंत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्याच्या बातम्याही आल्या होत्या. या घडामोडींनंतर हेमंत पाटील यांच समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज मध्यरात्री समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मला जसा श्रीकांत आहे तसाच हेमंत आहे. त्याला मुख्य प्रवाहातून बाजूला जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Lok Sabha Election: वंचितची पुणे, शिरुरमध्ये मोठी खेळी; तगडे उमेदवार कुणाला आणणार गॅसवर?

आंदोलकांना समजावून सांगण्यात नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागली. स्वतः हेमंत पाटील आणि मंत्री संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. जवळपास अर्धा ते पाऊण तास हे आंदोलन सुरू होते. हेमंत पाटील यांच्यावर अन्याय झाला तर सहन करणार नाही. त्यांना उमेदवारी मिळायलाच हवी, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यानंतर एकनाथ शिंदे अन्याय करणार नाहीत यासंदर्भात उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे हेमंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर हिंगोली मतदारसंघाचा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सध्या भाजपचे हिंगोलीचे विद्यमान आमदार तान्हाजीराव मुटकुळे, कळमनुरीचे माजी आमदार गजाननराव घुगे, विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. पण या व्यतिरिक्त आणखी तीन नावांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यात माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार, रामदास पाटील सुमठाणकर यांच्या आणि उद्योग क्षेत्राचे तज्ज्ञ श्रीकांत पाटील यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातच रामदास पाटील सुमठाणकर यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर श्रीकांत पाटील यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे संयोजकपद देण्यात आले आहे. त्यामुळेच राजकारणाव्यतिरिक्त असलेल्या या नावांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

हेमंत पाटलांना धोक्याची घंटा! भाजप हिंगोली घेण्याच्या अन् सरप्राईज उमेदवारही देण्याच्या तयारीत

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज