Hingoli Loksabha : अखेर शिंदेंच्या शिवसेनेची माघार, उमेदवार बदलण्याची शक्यता?

Hingoli Loksabha : अखेर शिंदेंच्या शिवसेनेची माघार, उमेदवार बदलण्याची शक्यता?

Shivsena : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मुंबईला बोलावून उमेदवारी न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे.

तानाजी सावंत सहा हजार कोटींचे लाभार्थी, निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी : रोहित पवारांचे आरोप

मागील काही दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे काल हिंगोली मतदारसंघात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीतही हेमंत पाटलांना उमेदवारी नको असा सूर देण्यात आला आहे. यासोबत कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. जर हेमंत पाटलांना उमेदवारी दिल्यास आम्ही हेमंत पाटलांचं काम करणार नसल्याचं कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेची महायुतीकडून गंभीर दखल घेण्यात आली. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ हेमंत पाटील यांना मुंबईला बोलावून घेत त्यांना काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता हिंगोली मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

आम्ही जाऊन आणखी बिघाड… म्हणून मविआशी समझोता तुटला; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये हेमंत पाटलांनाही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपकडून कडाडून विरोध होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटलांशी बैठक केली. या बैठकीत त्यांनी हेमंत पाटलांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत शिंदेंनी सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजप नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आलीयं. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांनीच आता महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा विडा उचलावा, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, हिंगोलीत हेमंत पाटील यांना महायुतीकडून देण्यात आलेली उमेदवारी शिंदेंनी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याऐवजी बाबुराव कदम यांना उमदेवारी देण्याच येऊ शकतो? याचीही चाचपणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

सध्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या आठ जागांपैकी एखाद्यवेळी उमेदवार बदलण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात एखादा उमेदवार बदलू शकतो असंही शिरसाट म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज