तानाजी सावंत सहा हजार कोटींचे लाभार्थी, निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी : रोहित पवारांचे आरोप

तानाजी सावंत सहा हजार कोटींचे लाभार्थी, निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी : रोहित पवारांचे आरोप

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी दाखवली आहे, असा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सावंत अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले होते.

Amitabh Bachchan: अ‍ॅक्शन सीनसाठी 30 फूटांवरुन अभिनेत्याने मारली होती उडी; म्हणाले… 

रोहित पवार म्हणाले, निवडणुकीच्या निधीसाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो लहान बालकांचा सुविधेअभावी शासकीय रुग्णालयात बळी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. शासकीय रुग्णालयांत आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी दोन हजार कोटी रुपले लागले असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सरकारने साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा केला. महिला व बालकल्याण विकासाचे जे बजेट आहे, त्यापेक्षा जास्त मोठा हा घोटाळा आहे.

Amitabh Bachchan: अ‍ॅक्शन सीनसाठी 30 फूटांवरुन अभिनेत्याने मारली होती उडी; म्हणाले… 

आजही दररोज ३८ बालेक मृत्यूमुखी पडतात आहेत आणि आरोग्य विभाग हा पैसे खाण्यात व्यस्त आहे, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. हा सर्वसामान्यांचा लढा आहे असून नियम कसे वळवण्यात आले, टेंडर कशाप्रकारे डिझाईन करून वळवले गेले, त्यांनी मी पाच दिवसांचा वेळ देतो, त्यांनी आपली बाजू मांडावी, असे आव्हानही त्यांनी सावंत यांना दिले.

बीव्हीजी कंपनी अनेक ठिकाणी काळ्या यादीत :

रोहित पवार पुढे म्हणाले, राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दोवोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीला निविदा देण्यात आली. त्यांच्याशी करार करण्यात आला. सुमित कंपनीने त्यांना निविदा तयार करून दिली होती. त्यांना स्वच्छतेचा अनुभव असून त्यांना रुग्णवाहिका सेवा देण्याचे कंत्राट देण्यात आले होते. सुमित कंपनीला कंत्राट मिळाल्यामुळे बीव्हीजी कंपनी अडचणीत आल्यावर त्यांचाही निविदेत समावेश करण्यात आला. बीव्हीजी कंपनीला अनेक ठिकाणी काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज