CM एकनाथ शिंदेबाबत धमकीची पोस्ट, मुंबई पोलिसांनी तरुणाला पुण्यातून केली अटक

  • Written By: Published:
CM एकनाथ शिंदेबाबत धमकीची पोस्ट, मुंबई पोलिसांनी तरुणाला पुण्यातून केली अटक

Threat Post Against CM Eknath Shinde : पुण्यातील एका 19 वर्षीय तरुणाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत गंभीर पोस्ट केली होती. याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळताच तपास करून अखेर त्या तरुणाला पुण्यातून (Pune) ताब्यात घेण्यात आलं. आरोपीला मुंबईला नेण्यात येत असून त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल.

कोणत्या मायमाऊलीकडून कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, अन् आमदारकीचा शब्द…; बारस्करांचे गंभीर आरोप 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुंड कसे बनायचे याविषयावर एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. या पोस्टला उत्तर देण्यासाठी या 19 वर्षीय तरुणाने एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदूक द्यायला तयार आहे.

कोणत्या मायमाऊलीकडून कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, अन् आमदारकीचा शब्द…; बारस्करांचे गंभीर आरोप 

दरम्यान, ही पोस्ट पाहिल्यानंतर एका यूजरने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याची पडताळणी केली असता हा प्रकार गंभीर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळं तात्काळ याबाबत समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून संबंधित प्रोफाईलचा वापर करण्याऱ्याची माहिती मिळली. तरुणाची माहिती मिळवली असता तो पुण्यात राहत असल्याचं पोलिसांना समजलं.

यानंतर मुंबई पोलिसांने एक पथक तातडीने पुण्यात दाखल झाले. त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीला मुंबईत आणल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, १९ वर्षीय आरोपी संगणक विषयातील पदवीधर आहे. त्याने कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये शिक्षण घेतले आहे. तो मूळचा नांदेडचा असून सध्या पुण्यात राहतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube