कोणत्या मायमाऊलीकडून कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, अन् आमदारकीचा शब्द…; बारस्करांचे गंभीर आरोप

  • Written By: Published:
कोणत्या मायमाऊलीकडून कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, अन् आमदारकीचा शब्द…; बारस्करांचे गंभीर आरोप

Ajay Maharaj Barskar : काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटी ( Manoj Jarange Patil)यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनंतर बारस्करांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. जरागेंनी बारस्करांवर बलात्काराचे आणि विनयभंगाचे आरोप केले होते. त्यानंतर आज बारस्करांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कुठल्यातरी महिलेला जरांगेंनी अंबडचा आमदार करण्याचा शब्द दिल्याचा आरोपही बारस्कर यांनी यावेळी केला.

Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल 

अजय महाराज बारस्कर यांना आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मी प्रश्न उपस्थित केले. मी वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. जरांगे पाटील वारंवार पलटी मारत होते. त्यांचा अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान नाही. स्वभाव अहंकारी आहे. त्यांचा मी पणा यावर मी बोट ठेवलं होतं. मात्र, त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. मी आरक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले होते. मी वैयक्तिक प्रश्न विचारले होते का? असा सवाल बारस्कर महाराजांनी केला.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार : प्रशासकीय हालचालींना वेग 

ते म्हणाले, गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तु रात्री कोणाच्या घरी जाऊन दूध-भात, दूध-भाकरी खात होता? माझ्याकडे पुरावे नाहीत का? कोणत्या माय माऊलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, याचे माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कोणत्या माता माऊलीला तू अंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय, तेही आम्हाला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. सामाजिक प्रश्नांवर आम्ही आवाज उठवला. डील काय झालीये आम्हाला माहित आहे, असंही बासस्कर महाराज म्हणाले.

जरांगेंविरोधात आयकर विभागात जाणार
बारस्कर म्हणाले, तुमच्या पाहुण्यांच्या दादात डंपर कसे आले? वाळू उपसा करायचे ४५ डंपर कसे आले? तीन महिन्यांत आले. तपास करा. मी आयकर विभागात जाणार आहे. एका रात्रीत माणसाकडे इतके पैसे कसे येतात ? असा सवालही बारस्कर महाराजांनी केला.

कोणाच्या तरी सांगण्यावरून 20 तारखेचं आंदोलन केले, जरांगे पाटील यांनी पलटी का मारली? जरांगेंवर आता विश्वास राहिला नाही. जरागे पाटील म्हणतात की, मी बोलतो म्हणजे ट्रॅप आहे. गेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्यावर मी कोणताही आरोप केलेला नाही. मी नार्को चाचणीसह इतर चाचण्या करण्यास तयार आहे, असं बारस्कर म्हणाले.

पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणाचे कुटुंब राहिले?
आम्ही तुला सामाजिक चळवळीचे प्रश्न विचारले होते आणि तू आमच्याघरापर्यंत आला. आम्हाला माहिती नाही का, मुंबईला मोर्चा आल्यावर पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणाचे कुटुंब राहिले? माझ्याकडे व्हिडिओ नाहीत?पण मला मला कोणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही तुकोबारायांचे वारकरी आहोत याचे असे 50 ते 100 रेकॉर्डिंग आहेत, असा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज