Sanjay Raut : “एकनाथ शिंदे भाजपचे नोकर, आज बाळासाहेब असते तर”.. राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : “एकनाथ शिंदे भाजपचे नोकर, आज बाळासाहेब असते तर”.. राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde : मातोश्री बंगल्यातील बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा (Amit Shah) आणि उद्धव ठाकरे यांच्यात (Uddhav Thackeray) चर्चा झाली होती. भाजपाचे इतर नेतेही तेथे होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता पूर्णपणे भाजपाचे नोकर झाले आहेत. त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करत आहेत अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले. तसेच महाअधिवेशनात मोदींना पुन्हा (PM Narendra Modi) पंतप्रधान करण्याचा आणि भाजपाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला म्हणून शिंदे गटावर आगपाखड केली. आज बाळासाहेब असते तर त्यांनी या लोकांचा कडेलोट केला असता अशी टीकाही राऊत यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर ती व्यक्ती बसलेली आहे पण महाराष्ट्राने त्यांना काहीही बोलण्याचे लायसन्स दिलेले नाही. महाशय बोलत असताना अधिवेशातून लोकं उठून जात होते त्याचे व्हिडिओ आले आहेत. महाशय असे म्हणत आहे की अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली नाही. किती खोटे बोलत आहे हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीमध्ये कशाला आले होते ? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले ? हा प्रश्न स्वतःला या महाशयांनी (एकनाथ शिंदे) विचारावा. त्यावेळेस शिंदे मातोश्री येथे होते का ? बंद दाराआड झालेल्या चर्चेवेळी मी होतो ते नव्हते.

Manoj Jarange : ‘अधिवेशनात ‘सगेसोयऱ्यां’बाबत भूमिका स्पष्ट करा नाहीतर’.. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

शिंदे भाजपाचे गुलाम आणि नोकर 

शिंदे यांना तेव्हा काय स्थान होते, तेव्हा ते पक्षाचे नेते देखील नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आता केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शहा यांनी सांगावे. अमित शहा बाळासाहेबांच्या खोलीत गेले होते की नाही हे आमित शहा यांनी सांगावे.त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेते होते. एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाले आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करत आहेत, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.

बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता 

2014 मध्ये युती तुटल्यानंतर लोकसभा निवडणूक आपण जिंकू शकत नाही तेव्हा अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर कशा करता आले त्याचे उत्तर या महाशयांनी द्यावे. मोदी आणि अमित शहांबरोबर राहून राहून यांना खोटं बोलण्याचे व्यसन जडले आहे. हॉटेल ब्लू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस पॉवर शेअरिंग फिफ्टी-फिफ्टी असे म्हणाले होते. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाही. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ही लाचारी बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता, अशी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली.

Navjyot Singh Sidhhu : लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, तीन आमदारांसह सिद्धू भाजपमध्ये जाणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज