Navjyot Singh Sidhhu : लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, तीन आमदारांसह सिद्धू भाजपमध्ये जाणार?

Navjyot Singh Sidhhu  : लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, तीन आमदारांसह सिद्धू भाजपमध्ये जाणार?

Navjyot Singh Sidhhu : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे काँग्रेस पक्षाला सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी तीन आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.

निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे महाराष्ट्रामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यानंतर दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर तिकडे मध्यप्रदेशमध्ये देखील कमलनाथ भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता पंजाबमध्ये देखील काँग्रेसला धक्का बसणार आहे.

CM शिदेंच्या भाषणाकडे कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड

सिद्धू यांच्या बद्दल सांगायचं झालं तर 2017 मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते म्हटले होते की, ते जन्मजात काँग्रेसी आहेत. त्यामुळे ते आता पुन्हा आपल्या मुळांशी जोडले गेले आहेत. अगोदर क्रिकेटर आणि त्यानंतर राजकीय करिअर सुरू केलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ते कोणाच्याही हाताखाली काम करायला तयार असल्याचे म्हटले होते. मात्र आता ते पक्षाला कंटाळ्याचं बोललं जात आहे.

जुना फोटो शेअर करत रोहित पवारांचे अजितदादांना आता थेट आव्हान

तसेच सिद्धुंचं राजकीय करिअर 2004 मध्ये सुरुवात झालं. त्यावेळी त्यांनी अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे दिग्गज नेते आरएन भाटिया यांचा पराभव केला होता. मात्र शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांची पंजाबमध्ये युती असून देखील सिद्धू आणि बादल यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. तसेच पक्षांमध्ये देखील सिद्धू यांचे संबंध बिघडत चालले होते. त्यामुळे सिद्धू यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरला होता. मात्र आता पुन्हा एकदा सिद्धू हे काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरणार असल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube