राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

Atul Bhatkhalkar Cm Eknath Shinde

Ram Mandir inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya)येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात (Shri Ram Temple)रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी देशभरात दिवाळी (Diwali)साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public holiday)जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा राजकीय स्टंट? पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. जवळपास 500 ते 550 वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे.

Goldy Brar : गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

शेकडो रामभक्तांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचं काम झालं आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची सर्वच राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक रामभक्तांला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाता येत नसलं तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचं आयोजन सर्वत्र करण्यात आलं आहे.

विविध भागात होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावं, विविध सोहळ्यात सहभागी होता यावं, यासाठी त्या दिवशी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहावं लागणार आहे.

follow us