Maratha Reservation : आरक्षणावर रितेश देशमुख, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटी नेमकं काय म्हणाले? कोणी दिलं आंदोलनाला समर्थन?

  • Written By: Published:
Maratha Reservation : आरक्षणावर रितेश देशमुख, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटी नेमकं काय म्हणाले? कोणी दिलं आंदोलनाला समर्थन?

Celebrity on Maratha Reservation : चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला. सर्व स्तरातून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत असतांना अनेक सेलिब्रिटी कलावंतांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्याविषयी पोस्ट लिहिल्या.

Tiger 3: टायगर 3 चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकींगची तारीख ठरली! 

जरांगेच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. अनेक ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. सोमवारी तर आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आमदारांची घरं, शासकीय कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली. राज्यातील परिस्थिती चिघळत चालली. मात्र, सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर अद्याप कार्यवाही केली नाही. त्यामुळं अशातच अभिनेते किरण माने, अश्विनी महांगडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत आंदोलनाला पाठिंबा दिला. तर रितेश देशमुखनेही आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकर तोडगा निघावा, असं म्हटलं.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट केलं की, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागण्याांसाठी जरांगे पाटील शांतापूर्ण उपोषणला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा बाळगतो” असं ट्वीट रितेश यांनी केलं.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एका सिध्द केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणााऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा, आम्हाला तुमची गरज आहे”

अभिनेत्री अश्विनी महांगडेने साखळी उपोषणात सहभाग होत एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, “आता नाही तर कधीच नाही…. विद्यार्थी… स्वप्ने… मेहनत… परीक्षा… उत्तीर्ण… यश… तरीही अपयश… मग आक्रोश… यातना… मग परत परीक्षा… मग परत सगळे तेच आधीचे पाढे…. आणि मग आत्महत्या… हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही, यासाठी उभं राहायला हवं. या लढ्यात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ट्विट केले आहे की, “आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोल हिंसक वळण घेतलं… मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासाळतेय… त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र अशांत होता कामा नये. जय शिवराय”

अभिनेत्री केतकी चितळे हिने बसमधील तोडफोडीचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “एसटी बसची तोडफोड करून आरक्षण कसे मिळते बुवा? इंडियाला युसीसी हवा असेल, पण भारताला युनिफॉर्म क्रिमीनल लॉची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला तर?”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube