Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा’; आमदार गडाखांनी केली मागणी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा’; आमदार गडाखांनी केली मागणी

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीला आमदार शंकरराव गडाख(Shankarao Gadakh) यांनी देखील आपला पाठिंबा दर्शिवला आहे. नेवासा येथे मराठा समाज बांधव साखळी उपोषणास बसले असून या उपोषण स्थळाला गडाख यांनी भेट दिली. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्यास आमचा कायम पाठिंबा आहे, असे यावेळी आमदार गडाख म्हणाले.

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीला बोलावलं का? देसाईंनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्य उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत.

Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

यातही मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. यातच आरक्षणाची ठिणगी नगर जिल्ह्याला देखील पडली आहे. यामुळे आता नेतेमंडळी देखील आरक्षणाला आपला पाठिंबा देत आहे.

Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा…
आरक्षणाला पाठिंबा देत असताना आमदार गडाख म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे यासाठी इतर सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे . सरकारने यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजे.

फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप

विशेष अधिवेशन बोलावून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे . दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे व तातडीने आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी आमदार गडाख यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज