Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, यासाठी राज्यात आमदार-खासदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र (Resignation)सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation)नगरसेविका कमल सप्रे (kamal sapre)यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Javle)यांच्याकडे सुपूर्द केला.
Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात
यावर नगरसेविका सप्रे म्हणाल्या की, मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देत नाही. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत, तरी त्यांची प्रकृती चांगलीच खालवली आहे. आजपर्यंत मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी त्या आत्महत्या करणाऱ्यांचं बलिदान वाया जाऊ नये, आणि मराठा समाजाला हक्काच आरक्षण मिळावं, यासाठी मी माझ्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहे, असेही यावेळी नगरसेविका सप्रे यांनी सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफीतही इंग्लंडचे गणित बिघडले; विश्वचषकातील खराब प्रदर्शन भोवले
सकल मराठा बांधव गेली 40 वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहेत. राज्यकर्ते फक्त मराठ्यांचे राजकारणासाठी वापर करीत आहेत. राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी अजून किती बळी हवे आहेत? आज समाजबांधवावर होणारा अन्याय सहन होत नसल्यामुळे मी ज्या समाजाने मला पदावर बसवले त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आणि भविष्यात समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी, नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
समाजात राजकारण करत असताना, सर्व जाती-धर्माला एकत्र करून प्रत्येक जाती-धर्माला कसा न्याय देता येईल, यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाण असताना राजकारणी स्वतः फायद्यासाठी वापर करतात, याचा निषेध म्हणून आणि अहिल्यानगर व नागापूर-बोल्हेगांव परिसरातील जनतेला न्याय मिळावा, म्हणून आपण नैतिकतेने राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे, अशीही मागणी कमल सप्रे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. हे राजीनामा पत्र मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.