Maratha Reservation : आंदोलनाला बळ! मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं उपोषण

Maratha Reservation : आंदोलनाला बळ! मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं उपोषण

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन आता चांगलेच पेटले आहे. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना या आंदोलनाचा फटका बसला आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. मंत्रालयाबाहेर तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना ठाकरे गटाच्या एका आमदाराचा समावेश आहे. या तीन आमदारांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी

अजित पवार गटातील आमदार निलेश लंके, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार राजू नवघरे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.  तर दुसरीकडे आरक्षणाचे आंदोलनही चिघळत चालले आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलविण्याचीही चर्चा होत आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा – उद्धव ठाकरे 

केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हान उद्धव ठाकर यांनी दिले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड असे सर्व जण मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी.

राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसालं तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले पाहिजे. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर राज्यातील 48 खासदारांनी राजीनामे दिला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी चळवळ उभी राहिली होती, तशी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील एकता दाखवून दिली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

मुख्यमंत्र्यांचा मनोज जरांगेंना फोन

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचा दाह कमी करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी फोन केला. पण यावेळी नोंदीनुसार अहवाल स्वीकारुन आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाही. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. त्यावर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे, आम्ही थोडे राहिलो आहोत, त्यांनाही आता ओबीसीमध्ये घ्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube