Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच यात आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेचे (Shivsena) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके आणि काँग्रेसचे (Congress) परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा सादर केला. यापूर्वी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, खासदार हेमंत गोडसे आणि गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Four MLAs and two MPs have resigned for Maratha reservation.)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्य उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव म्हणून ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत. यातही मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे.

Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं

या पार्श्वभूमीवर या आंदोलनात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देत राजकीय नेत्यांनी आपले विधानसभा, लोकसभा सदस्यत्व सोडत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत चार आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यात गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार, शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके, काँग्रेसचे परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश आहे.

Maratha Reservation : प्रकाश सोळंकेंचे बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातूनही आगीचे लोट

मुख्यमंत्र्यांचा मनोज जरांगेंना फोन :

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचा दाह कमी करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी फोन केला. पण यावेळी नोंदीनुसार अहवाल स्वीकारुन आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाही. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. त्यावर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे, आम्ही थोडे राहिलो आहोत, त्यांनाही आता ओबीसीमध्ये घ्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube