Maratha Reservation : प्रकाश सोळंकेंचे बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातूनही आगीचे लोट
Maratha Reservaition : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांचं निवासस्थान पेटवल्यानंतर आता बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातून आगीचे लोळ पाहायला मिळाले आहेत. धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात मराठा आंदोलकांना गाड्या जाळून टाकल्या आहेत. एवढचं नाहीतर सोळंके यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर आणून जाळले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केलेली असतानाही मराठा आंदोलकांकडून जाळपोळीच्या घटना घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजीनामा सत्र सुरूच! मराठा आरक्षणासाठी हेमंत गोडसेंनी दिला राजीनामा, शिंदे गटाला मोठा झटका
सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहे. ठिकठिकाणी या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये आंदोलकांचा फटका आता आमदारांना बसण्यास सुरूवात झाली असून, आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेयांच्या घरावर हल्लाबोल चढवत त्यांचे घर आणि दारासमोरील गाडी पेटवून दिली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे.
मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचाच पहिला राजीनामा; सत्ताधारी गटात नाराजी वाढली
मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा असल्याचे सांगत काहीजण अर्धवट क्लिप समाज माध्यमात व्हायरल करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याबाबतही तेच झाल्याचे सोळंकेंनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नसल्याचे सांगत आंदोलक काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिल्याने चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही.
मतदारांना ‘तो’ अधिकार नाही; राजकीय पक्षांच्या निधीबाबत केंद्र सरकारकडून न्यायालयात मोठं विधान
माझ्या घराचं आणि घराबाहेर उभ्या असलेली गाडी आंदोलकांनी पेटवून दिली असून, यात माझं घरचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर आमदार सोळेंकेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, घटनेपूर्वी मला आंदोलकांशी बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हणत जमावाने घरावर अचानक दगडफेक करण्यास सुरूवात केल्याचे म्हटले आहे.
बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत आहेत.
दरम्यान, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह 5 किलोमीटर अंतरापर्यंत तर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.