‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?

‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?

Mla Prakash Solanke Audio Clip : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांची मराठा आरक्षणासंदर्भात विधाने केलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपनंतर संतप्त मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांचं घरच पेटवून दिलं असल्याचं घटना समोर आली. कधीही ग्रामपंचायत निवडणूक न लढवणारा माणून आता हुशार झाला असल्याचं विधान सोळंके यांनी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांना उद्देशून केलं होतं. त्यावरुन मराठा आंदोलक संतप्त झाले.

बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला : ‘काळा दिवस’वरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमने-सामने

फोन कॉलमध्ये नेमकं संभाषण काय झालं?

सुंदर भोसले – रमेश पाटील आरक्षणाबद्दल बोलले की दादा तुम्ही राजीनामा द्या, त्यावर तुम्ही म्हटले की मतदारसंघातील लोकं बोलले तर देईन राजीनामा, आता हे सरकार तर काय आरक्षण देत नाही.

प्रकाश सोळंके – कोण म्हणतं देत नाहीत…40 दिवस मुदत दिली म्हणून काय झालं हे आरक्षण देऊन परत अडकवायचं का कोर्टात? अशी अडमूठी भूमिक देऊन चालणार नाही. कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करतयं, एवढंच शासनाचं म्हणणं. त्यासाठी जे काही करायचंय ते शासन करतंय.

सुंदर भोसले –
शासनाला 40 दिवस दिले होते आता बरेच दिवस उलटून गेलेत.

प्रकाश सोळंके – सरकारने समिती नेमलीयं त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार
उद्या द्या आजच द्या, मागच्या दोन वेळेस दिलं होतं पण ते टिकलं का आता पण असंच करायचं काय घाईघाई करुन थोबाडीत खा…आरक्षण देण्याबद्दल कोणाचा विरोध नाही, कायदेशीरपणे टिकणारं आरक्षण द्यायचं आहे.

सुंदर भोसले – तुमच्यासारख्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली तर शासन देईल लवकर आरक्षण…

प्रकाश सोळंके – हे मागणं देणं हा पोरखेळ झालायं नूसता…काय अर्थ आहे कायं त्याला…समितीचा अहवाल आल्यानंतर शासनाला धारेवर धरणं योग्य..आम्ही तर आरक्षणासाठी भांडतोयंच. आमचा रेटा तर चालूच आहे.

सुंदर भोसले – शासनाला 30 दिवस मुदत देऊन 10 दिवस बोनस दिले होते.

प्रकाश सोळंके – बोनस देणाराही महाहुशार माणूस आहे. त्याने कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही पण आता तो सर्वांत हुशार माणूस झालायं…

सुंदर भोसले – आपल्या पोरांची इतकी टक्केवारी लागूनही नंबर लागत नाही ना आरक्षण नसल्याने हे होतंय…

प्रकाश सोळंके – एससी समाजाला 75 वर्षे झालं आरक्षण आहे गावागावांत लय अशी सुधारणा झाली काय? तुम्ही माझी रेकॉर्डींग करता आहात मला माहित आहे कार रेकॉर्डींग मी काय घाबरतो का कोणाला? 75 वर्षे झाली आदिवासी मागासवर्गीयांना आरक्षण मिळालंय तरीही अजून त्यांचे खायचे वांदेच आहेत. तुमचं मत आहे की, आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील तसं माझं मत नाही चार-दोन टक्के लोकांना त्याचा फायदा होईल बाकीचे वंचितच राहणार आहेत. त्याला शेवटी शिक्षणाच्या अटी आहेत शेवटी त्याला मेरिटच लागतंच….

सुंदर भोसले – ओबीसीवाला 60 टक्क्यांवर लागतो ना पण आपला 80 टक्के पडूनही लागत नाही..

प्रकाश सोळंके – तसं नाही आरक्षण ओपनमध्ये 10 टक्के आहे त्यापैकी 8 टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळालायं…त्याची आकडेवारी नावासहित उपलब्ध आहे. 8 टक्के तर मेरीटवरच मिळालेले आहे. आरक्षण मिळालं तर 4 , 2 टक्क्यांचा फायदा होईल, सगळ्यांना नाही होणार शिक्षणात होईल पण नोकरीत नाही मिळणार.. शिकून करता काय नोकऱ्या तर पाहिजे ना?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube