बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला : ‘काळा दिवस’वरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमने-सामने

बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला : ‘काळा दिवस’वरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमने-सामने

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी उपायुक्त नितेश पाटील यांनी कन्नड समर्थक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत कन्नड राज्योत्सवानिमित्त काळा दिवस पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. (Maharashtra government has decided to send its government representative to take part in the Black Day observance by Maharashtra Ekikaran Samithi)

अबब! नाशिकमध्ये तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया; नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांचा प्रताप

मागील सहा दशकांपासून बेळगावी आणि इतर मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती संघर्ष करत आहे. या संघर्षाचा एक भाग म्हणून या समितीकडून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी बेळगावी येथे काळा दिवस पाळते. या काळ्या दिवसात सहभागी होण्यासाठी समितीकडून महाराष्ट्र सरकारला निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांना दणका देणार?; ॲड. उज्वल निकम यांचा इशारा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कन्नड संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “शिंदे यांची विधाने प्रक्षोभक आणि निषेधार्ह आहेत. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली नाही हे दुर्दैवी आहे. पण जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यापासून रोखले पाहिजे,” अशी संतप्त मागणी कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी केली आहे. त्याचवेळी उपायुक्त नितेश पाटील यांनी कन्नड समर्थक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत कन्नड राज्योत्सवानिमित्त काळा दिवस पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube