Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार राजीनामा देण्याचे ढोंग करत आहेत. खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का असा सवाल आहे. खरं म्हणजे, आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या राज्यात हिंसाचार होत आहे. भाजपाने एकनाथ शिंदेंना यासाठी मु्ख्यमंत्री केलं. काय तर म्हणे मराठा चेहरा. इथे मराठ्यांच्या तोंडाला फेस आलाय. मराठा मरतोय. मराठा जळतोय. एक मराठा मुख्यमंत्री अपयशी ठरतोय. हा कसला फेस आहे. त्यामुळे भाजपा 2024 च्या निवडणुकीत पराभूत होणार आहे आणि त्याचं श्रेय शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल, असं भाकित राऊत यांनी केलं.

Maratha Reservation : ’40 दिवस सरकार अजगरासारखे सुस्त पडले होते’; वडेट्टीवारांचा घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज