Sanjay Raut : फडणवीसांचं ‘ते’ वक्तव्य धिक्कार करण्यासारखं; राऊतांच्या वक्तव्यात शिंदेंचं कनेक्शन

Sanjay Raut : फडणवीसांचं ‘ते’ वक्तव्य धिक्कार करण्यासारखं; राऊतांच्या वक्तव्यात शिंदेंचं कनेक्शन

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घ्याल पण, त्यांच्या अपात्र आमदारांचं काय? एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घेणार हे फडणवीसांचं वक्तव्य धिक्कार करण्यासारखं आहे, असे राऊत म्हणाले.

फडणवीस म्हणाले, की शिंदे जर अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधानपरिषदेवर घेऊ आणि त्यांचं मु्ख्यमंत्रीपद टिकवू. शिंदे होतील विधानपरिषदेवर मुख्यमंत्री पण त्यांचे 40 आमदार अपात्र होतील त्याचं काय? प्रत्येकाला तुम्ही विधानपरिषदेवर घेऊन देशात घटनाबाह्य पद्धतीने तुम्ही राज्य करणार आहात का? असा सवाल करत फडणवीसांचं हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं आहे असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis : अपात्र झाले तरीही शिंदेच CM ! फडणवीसांनी कारणही सांगितलं

काय म्हणाले होते फडणवीस ?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तरी तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. शिंदेंना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल. एकतर शिंदे अपात्र होणारच नाहीत. पण जरी कदाचित तसं घडलं तरीही ते विधानपरिषदेवर येऊ शकतात. ज्याला कोर्ट समजतं. कोर्टाची ऑर्डर समजते. ज्याने सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली असेल. ज्याने निवडणूक आयोगाची ऑर्डर वाचली असेल तो शंभर टक्के सांगेल की शिंदे अपात्र होणार नाहीत, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.

आम्ही कुठेच कायदा मोडला नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. ते विधानपरिषदेवर येतील. त्यात अडचण काय. तरीही ते अपात्र होतच नाहीत. आमची संख्या अशी आहे की कुणीही डिस्क्वॉलीफाय झालं तरी अडचण नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत काम केलं आहे. कुठेही तसूभरही कायद्याची चौकट मोडलेली नाही. विचारपूर्वक नियमात बसून काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही, असे फडणवीस म्हणाले. विधानपरिषदेवर घेतले जाईल असे सांगितले असले तरी अपात्र झाल्यानंतर आमदारांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण; तब्येतीविषयी आली अपडेट

फडणवीसांचा इतिहास कच्चा 

शिवसेनेनेच मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण गेलं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. जात-पात-धर्म न पाहता आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, फडणवीसांना हे कधीच कळणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube