Maratha Reservation : ’40 दिवस सरकार अजगरासारखे सुस्त पडले होते’; वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारख सुस्त पडले होते अशी टीका वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसने (Congress) राज्यपालांना भेटून केली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी सरकारच्या काराभारावर सडकून टीका केली. सरकारला आवाहन करतोय की ही तुम्ही लावलेली आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात सरकारने विश्वास गमावला आहे. सरकारने आता पायउतार झाले पाहिजे. हे सरकार असंवैधानिक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलत आहेत. तीन तोंडाचे हे सरकार आहे.
Manoj Jarange : मोठी बातमी! CM शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; जरांगेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
विशेष अधिवेशनाच्या सरकारच्या हालचाली
राज्यातील या आंदोलनानंतर सरकारी पातळीवरही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. पाऊण तास झालेल्या या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. या भेटीत दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
उपोषणाचा आजचा सातवा दिवस
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. राज्यात हिंसक घटना सुरू झाल्याने आंदोलन चिघळले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर त्यांची आजची पत्रकार परिषद महत्वाची मानली जात आहे. या परिषदेेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
Supriya Sule : ‘काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’; सुळेंनी नेमकं काय सांगितलं?
सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम
मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेला मंत्रिमंडळ उपसमितीतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी ठाम असल्याचे सांगून आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.