Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असून त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आरक्षणासाठी विनंती करा, अन्यथा राजीनामे द्या, असं म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घणाघात केला आहे.

Bigg Boss 17 च्या घरात सुशांत सिंग राजपुतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने सोडलं मौन, म्हणाली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आजचा उपोषणाचा सातवा दिवस असून सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतप्त मराठा तरुणांकडून जाळपोळीच्या घटना घडवण्यात येत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनीही लोकसभेतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचं काम वेगाने सुरु असूनही अद्याप समितीने अहवाल सादर केलेला नाही. तेलंगणा राज्यातून निजामकालीन पुरावे मिळण्यासाठी समितीने राज्य सरकारकडून मुदत वाढवून घेतली आहे. अशातच आता मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस असून दुसकीकडे राज्य सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने मराठा तरुणांकडून राज्यभरात जाळपोळ करण्यात येत आहे.

आमचे कार्यालय फोडता का?, सरकारी पक्षातील व्यक्तींची ऑफर; जरांगेंचा गौप्यस्फोट

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हानही दिले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड असे सर्व जण मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. या मंत्र्यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा’ अशी टीका भाजपने केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज