आमचे कार्यालय फोडता का?, सरकारी पक्षातील व्यक्तींची ऑफर; जरांगेंचा गौप्यस्फोट
आंतरवाली सराटी : मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंत आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठी भरकटत चाललेले नसल्याचे सांगत आमच्या आंदोलनाला कुणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमधील काही मंत्री वाचळ पद्धतीने बोलत असून, त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरलं पाहिजे असे म्हणत सरकारी पक्षातील काही लोक आम्हाला आमचे कार्यलय फोडता का? अशी ऑफर देत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुवस्था आम्हाला बिघडवयाची नसून, तुम्ही तुमच्या लोकांना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला बळी घ्यायचा तर घेऊ द्या… समाजाचं भलं होत असेल तर मी मृत्यूलाही सामोरे जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Manoj Jarange Press Conference )
‘फडणवीस हे राज्यघटनेबाबत अज्ञानी’; शिंदेंबद्दलच्या वक्तव्यावर उल्हास बापट यांची सडकून टीका
उपस्थितांचा शब्द पाळत जरांगेंचा पाणी पिण्यास होकार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबरपासून अन्न आण पाण्याचा त्याग केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून जरांगे पाटलांच्या पोटात ना अन्नाचा कण गेला आहे ना पाण्याचा थेंब. यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. उपस्थितांशी बोलण्यास उभं राहण्याचा प्रयत्न करताना जरांगे स्टेजवरच कोसळले. यावेळी उपस्थितांच्या ह्रदयाचा ठोका चुकला.
Video : मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं; आक्रमक आंदोलकांनी पेटवलं आमदार प्रकाश सोळंकेंचं घर
यानंतर हजोरो नागरिकांनी त्यांना किमाना पाणी तरी पिण्याची विनंती केली. त्यानंतर मी माझ्या समाजाचा शब्द कधीच शब्द डावलत नाही असे म्हणत घोटभर पाणी पिण्यास होकार दर्शवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारला थोडा अवधी द्या असं आवाहन केलं. त्यावर थोडा म्हणजे किती? मुख्यमंत्र्यांना तुम्हीच विचारा. किती अवधी द्यायचा? थोडा म्हणजे 50 वर्ष का? असा सवाल त्यांनी केला.
1 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षणासाठीचा सध्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. मात्र, येत्या 1 नोव्हेंबरपासून या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केला जाईल आणि तो अजून जड असल्याचा इशारा यावेळी जरांगे पाटलांनी दिला. क्रूरेटिव्ह पिटीशनवर आमचा विश्वास नसल्याचेही यावेळी जरांगेंनी स्पष्ट केले.