Bigg Boss 17 च्या घरात सुशांत सिंग राजपुतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने सोडलं मौन, म्हणाली…

Bigg Boss 17 च्या घरात सुशांत सिंग राजपुतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने सोडलं मौन, म्हणाली…

Bigg Boss 17 : बिग बॉस (Big Boss 17 ) हा रिअ‍ॅलिटी शो नेहमीच चर्चेचा ठरत असतो. यामध्ये असणारे सर्वच स्पर्धकांची काहीना काही खासियत असते. तसेच अनेक चर्चित चेहरे यामध्ये घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच हा शो चर्चेत आणि वादात देखील सापडतो. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही सुपरहिट जोडीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेत प्रेक्षकांना खुश केलं आहे.

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी

अंकिताने पवित्र रिश्ता मधील अर्चना या भूमिकेसाठी आणि ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र या दरम्यान सर्वात जास्त चर्चेत राहिलं आहे. ते तिचं आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतसोबतचं नातं. तर या नात्याबद्दल बिग बॉसच्या घरात अंकिताने मौन सोडलं आहे.

काय म्हणाली अंकिता लोखंडे?

मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि एश्वर्या शर्माची जोरदार भांडणं झाली. त्यावेळी आपल्या आणि सुशांत सिंगच्या नात्यावर बोलताना अंकिता म्हणाली की, सुशांतच्या जाण्याचा मला मोठा धक्का बसला होता. माझ्यासह माझ्या आई-वडिलांना देखल हा मोठा धक्का होता. तो कसा होता? हे मीआजवर अनेकदा लोकांना सांगितलं आहे.

Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये

त्याचं निधन झालं तेव्हा मला लोकांनी खुप ट्रोल केलं. जर त्याच्या आयुष्यात मी असते तर त्याने आत्महत्या केली नसती. असं देखील अनेकांनी म्हटलं. पण त्याने जेव्हा माझ्यासोबत ब्रेक अप केलं तेव्हा नाही कोणी असं काही म्हटलं. असा सवाल देखील यावेळी अंकिताने केला. पुढे ती म्हणाली, त्याने मला सोडल तेव्हा मला खुप त्रास झाला.

एका रात्रीत माझं पुर्ण आयुष्य बदललं. त्याचं आणि माझं ब्रेक अप होण्यामागे विशेष असं काहीही कारण नाही. त्याने देखील ते मला सांगितलं नाही. त्याने जर मला त्याचं कारण सांगितलं असतं. तर गोष्ट वेगळी होती. कदाचित त्यातून मार्ग देखील काढता आला असता. मात्र त्याचं करिअर चांगलं सुरू होतं. त्याचे अनेकांनी कान भरले. त्यामुळे मी देखील त्याला थांबवले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube