Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये

Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये

Sonali Kulkarni Movie Short And Sweet : सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम (Ganesh Kadam) दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ (Short And Sweet) या मराठी सिनेमाचे (Marathi Movie ) चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत, यामध्ये आणखीही दोन नवीन नवोदित कलाकार झळकणार आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला ना? कोण हे कलाकार? तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई- बाबा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubham Production (@shubham.production_)


पुण्यात चित्रीकरण होत असल्याने सोनालीचे आई- बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करत असतंच सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई- बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिल्याचे बघायला मिळाले आहे. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनी देखील अभिनय करण्याची संधी स्विकारली. या मराठी सिनेमात ते सहप्रवाशाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहेत.

आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद त्यांना काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर सोनालीलाही आपल्या आई- बाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे सांगितले आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या मराठी सिनेमाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा सिनेमा येत्या 3 नोव्हेंबर दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Vikramaditya Motwa: फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

सोनालीने या मराठी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्या पोस्टरवर लिहिलं आहे की, ‘या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे, जे आपल्याला संपूर्ण आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची, सामोरे जाण्याची शक्ती देते”. ‘शॉर्ट अॅण्ड स्वीट’ या कौटुंबिक सिनेमाची चाहत्यांना चान्गलीच उत्सुकता लागली आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,”सहकुटुंब, सहपरिवार एकत्र आनंद घ्या, या गोड सरप्राईजचा ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला”, असे तिने यावेळी लिहिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube