नगर दक्षिणेत पुन्हा विखे-गडाख; 1991 ची पुनरावृत्ती होणार? शंकरराव गडाखांनी सांगितलं
Sharankarao Gadakh : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता नगर दक्षिण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख(Shankrao Gadakh) आणि भाजपचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे 1991 साली शंकरराव गडाख यांचे पिता माजी खासदार यशवंतराव गडाख(Yashwant Gadakh) यांच्यात आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील(Balasaheb Vikhe) यांच्यात खासदारकीसाठी चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे आत्ताही अशीच लढत होऊन 1991 ची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे.
गाडीत बसवलं, घरी नेलं, जुन्या शिलेदाराची भेटही घडवली : अजितदादांच्या आमदाराकडून पवारांचा पाहुणचार
आमदार शंकराव गडाख यांचा मतदारसंघ नेवासा तालुका हा उत्तर लोकसभा मतदारसंघात येत असला तरीही गडाख कुटुंबियांचा दक्षिण लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. नगर दक्षिणेची जागा याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली मात्र, अद्याप राष्ट्रवादीला या मतदारंसघातून यश मिळालेलं नाही. त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार शंकरराव गडाख असू शकतात, असा अंदाजही लावण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून शंकरराव गडाख यांना लोकसभेबाबत विचारपूसही झाल्याचं सांगितलं जात आहे.
टेनिस-स्क्वॉशमध्ये गोल्ड, हॉकीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवा दिवस भारताचा
सध्या सुरु असलेल्या चर्चेवर खुद्द शंकरराव गडाखांनी थेट भाष्य केलं असून ते म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणावं तशी कामे झालेली नाहीत, कार्यकर्त्यांनी मात्र मला दक्षिण मतदारसंघातून खासदारकीबाबत सुचवलंयं, यासंदर्भात शिवसेनेचे निरीक्षक सुनिल शिंदे आणि खासदार संजय राऊत माझ्याशी बोलले की अशी चर्चा आहेत, मात्र, जेव्हा मला पक्षाकडून अधिकृतपणे विचारणा होईल, तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केलं आहे.
“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार
तसेच पक्षाच्या फाटाफुटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा चर्चा होत असतात त्या सुरु झाल्या आहेत कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्याची महत्वाची भूमिका असते, कार्यकर्त्याला अंदाज असतो, मला कार्यकर्ते चांगले सल्ले देत असतात, दक्षिण मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी फक्त चर्चा सुरु केली आहे. सर्व गोष्टींचा विचार करुनच पक्षश्रेष्ठी आणि मी निर्णय घेणार असल्याचंही शंकराव गडाख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सध्या नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे असून शंकराव गडाख यांनी निवडणूक लढवणार असतील तर ही जागा ठाकरे गटाला सोडली जाईल का? हे कोडं महाविकास आघाडीसमोर असणार आहे. त्यामुळे विखे आणी गडाख यांची लढत चुरशीची होईल, असं बोललं जात आहे.