Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीला बोलावलं का? देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीला बोलावलं का? देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावले पण, उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री संकुचित मनोवृत्तीचे आहेत, असे म्हटले. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. शंभूराज देसाई म्हणाले, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवारांना बोलावलं आहे. उद्धव ठाकरेंनाही बोलावलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले अशा सर्व प्रमुख लोकांना बोलावले आहे. आता महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा या नेत्यांनी विचार करून चर्चा करावी, असे देसाई म्हणाले.

Maratha Reservation : ‘…तर पाणीही बंद करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम!

मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच ही सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. आता या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी विचार विनिमय करावा. सरकरा सगळ्यांचं ऐकून घेईल. आजच्या बैठकीत जे ठरेल त्यावर सरकार सकारात्मक पावलं उचलेल. सरकारची याकामी आडमुठी भूमिका नाही, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार 

आम्ही आमदारही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. मतदारसंघातील चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. आरक्षण द्यायचं नाही, असे आमच्यातील एकतरी आमदार म्हटला का ? सर्व आमदारांचं म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटीत टिकणारं, नियमात बसणारं आणि तहहयात शिक्कामोर्तब होईल असं आरक्षण द्यायचं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचंही हेच मत आहे, असेही देसाई यांनी सांगितलं.

घटनाबाह्य सरकारची घटका भरली – राऊत 

या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्लज्ज राजकारण सुरुच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण, शिवसेना यांच्या डोळ्यांत खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण, प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे.

Sanjay Raut : ‘घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच’; सरकारच्या ‘खेळी’वर राऊतांचा संताप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज