Tiger 3: टायगर 3 चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकींगची तारीख ठरली!

Tiger 3: टायगर 3 चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकींगची तारीख ठरली!

Tiger 3 Movie : यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्स चित्रपट टायगर 3 येत्या 12 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत अपडेट समोर आली आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स तिकीटासाठी बुकींग सुरु करण्यात येणार आहे. ऐन सणाच्या दिवसांतच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सर्वपक्षीय बैठकीवरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

टायगर चित्रपटाला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाच्या तिसरा भाग दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान टायगर तर इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून 12 नोव्हेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून देशभरात चित्रपटाचे शो सुरू होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

टायगर 3 चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. येत्या 12 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजताच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. पहिल्या शोसाठी अॅडव्हान्स बुकींची तारीखही ठरली आहे. 5 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या तिकीटाची बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रमुख नेत्यांच्या फोन हॅकप्रकणाला नवं वळण; अलर्टचं कारण सांगण्यास अ‍ॅपलचा स्पष्ट नकार

प्रेक्षकांना टायगर 3 चित्रपट पाहण्यासाठी 3 प्रकारांत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक हा चित्रपट प्रीमियम फॉरमॅटमध्येही पाहु शकणार आहेत. यामध्ये यशराज फिल्मने 2D, IMAX 2D, 4dx 2d, PVR P[XL] , dbox, 4DE मोशनमध्येही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, टायगर 3 हा चित्रपट फक्त हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube