Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटताच बीड जिल्ह्यात आमदारांचं घर पेटवण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 27 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 27 जणांना पोलिसांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 16 मराठा आंदोलकांचा पोलिस तपास घेत आहेत.

एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने.

Maratha Reservation : आंदोलनाला बळ! मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं उपोषण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत होते.

Maratha Reservation : जामखेड, राहुरी, श्रीगोंद्यात बंदची हाक; पाथर्डीत मोटारसायकल रॅली

बीडमध्ये घडलेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड शहरासह राष्ट्रीय महामार्ग परिसरात संचारबंदीचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिल्यानंतरही आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील

संबंधित घटना घडल्यानंतर बीड पोलिसांनी मराठा आंदोलक तरुणांची धरपकड सुरु केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 26 जणांना अटक केली होती. या जाळपोळमध्ये इतरही अनेक आंदोलकांचा पोलिसांकडून तपास सुरु असून आज 26 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज