Maratha Reservation : जामखेड, राहुरी, श्रीगोंद्यात बंदची हाक; पाथर्डीत मोटारसायकल रॅली
Maratha Reservation : राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने (Maratha Reservation) आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले असून या आंदोलनाला आता पाठिंबा देखील वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डी येथे आरक्षणासाठी सोमवारी बंद पाळण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जामखेड व राहुरी याठिकाणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून नुकतेच कर्जत तालुक्यात जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. आंदोलनाला आता हिंसक वळण लागत असल्याने प्रशासन देखील आता सतर्क झाले आहे. सध्या या आंदोलनाने उग्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. बीडपाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी
जामखेड बंद
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा व आरक्षण मिळावे यासाठी आज (31 ऑक्टोबर ) रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचे रितसर निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जरांगे हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी हे प्राणांतिक उपोषण सुरू केले असून सरकारने त्याबाबत काही दखल घेतली नाही. जरांगे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मात्र या निर्दयी सरकारला जाग येण्यासाठी आम्ही जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
राहुरी बंदचे आवाहन
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नगर जिल्ह्यात देखील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. यातच आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा मिळावा यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात येत आहे. आज जामखेडसह राहुरीमध्ये देखील बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाथर्डीतील हनुमान टाकळी येथे मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळण्यात आला.
Maratha reservation : आंदोलक आक्रमक झाल्यानं आमदार-खासदारांच्या घराला पोलिसांचा खडा पहारा….
श्रीगोंद्यातही बंदची हाक
श्रीगोंदा तालुक्यातही बंदची हाक देण्यात आली आहे. काष्टी येथे सकाळी दहा वाजता रास्तारोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली. याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील आठ गावांत राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी दोन नगरसेवक आणि एका सोसायटीच्या संचालकांनी राजीनामा दिला आहे.
बीडमध्ये आमदारचे घर अन् कार्यालय जाळले
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आली. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली. या परिस्थिती जिल्हा प्रशासनाने येथे तत्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.