Maratha reservation : आंदोलक आक्रमक झाल्यानं आमदार-खासदारांच्या घराला पोलिसांचा खडा पहारा….

  • Written By: Published:
Maratha reservation : आंदोलक आक्रमक झाल्यानं आमदार-खासदारांच्या घराला पोलिसांचा खडा पहारा….

Maratha reservation : चाळीस दिवसांची मुदत देऊनही अद्याप मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न मार्गी न लागल्यानं मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आता मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे घरच पेटवून दिल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळफोळीच्या घटना घडल्या आहेत. मराठा समाजाचा रोष पाहून अनेक मंत्र्याच्या घराला पोलीस सुरक्षा (Police Security) पुरवण्यात आली.

Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू! 

मनोज जरागेंची तब्येत ढासाळत चालल्यानं मराठा आंदोलक आता चांगलेच आक्रमक झाला आहे. ते राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारत आहेत. काळे झेंडे दाखवत आहेत. संपूर्ण राज्यातील परिस्थिती चिघळत चालली आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळफोळीच्या घटना घटल्या. आंदोलकांनी लोकप्रतिनिंधीचे घरही जाळली. त्यामुळं राज्यातील चिघळलेली परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींना आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले.

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यांनी मराठा समाजाला शिवागाळ केली होती. त्यामुळं राणेंच्या जुहुतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनीही वारंवार मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळं त्यांच्याही नाशिकच्या घराजवळ पोलीस तैनात करण्यात आले. तर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याघराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाट जमला आहे.

काही तासांआधी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान आणि त्यांची वाहने आंदोलकांनी जाळली. तर दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय संतप्त आंदोलकांनी फोडले. मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते खासदार इम्तियाज जलील यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरे व कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील ‘या’ नेत्यांना पुरवली सुरक्षा
छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे आणि उदयसिंग राजपूत या सर्वाच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube