Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलच वादंग पेटलं आहे. मराठवाड्यातील संतप्त मराठा आंदोलकांनी आमदारांच्या निवास्थानांवर हल्लाबोल करीत जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढचं नाहीतर माजलगाव नगरपरिषद कार्यालयालाही आग लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह 5 किलोमीटर अंतरापर्यंत तर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.

Maratha Reservation: बीडमध्ये भडका ! आमदार संदीप क्षीरसागरांचे घर, कार्यालय पेटवले

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले आहे. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली आहेत.

‘या’ सरकारी नोकऱ्यांसाठी आताच करा अर्ज, पदवीधर उमेदवारांनी करू शकतात अर्ज

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत आहेत.

मराठा समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षण ठेवणार का? ठाकरेंचा संतप्त सवाल

हिंसक आंदोलनामुळे प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहे. बीड शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलेला आहे. तर आता बीड जिल्हा बंद करण्याची घोषणाही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

Horoscope Today : ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

जिल्ह्यात सकाळपासून आंदोलन आक्रमक झाले आहेत. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या घराला आग लावण्या आली आहे. त्यानंत बीड शहरातही आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान व कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. दरम्यान, बीड शहरात बंदोबस्त असतानाही आंदोलकर्त्यांना पोलिसांना चुकवत आग लावली आहे. क्षीरसागर यांच्या घराला लावलेला व्हिडिओ हा आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहेत. त्यात आग तीव्र स्वरूपाची दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज