मराठा समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षण ठेवणार का? ठाकरेंचा संतप्त सवाल
Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाच दिवस झाले. त्यांनी अन्न आणि जलत्याग केला. त्यामुळं त्यांची तब्येत खालावली. आरक्षणासाठी अनेक जण टोकाचं पाऊल उचलत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारला चांगलंच घेरलं. मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षण ठेवणार का?, असा सवाल ठाकरेंनी केला.
‘यापुढं माझ्या कुटुंबाला माझ्यासोर आणू नका, कारण…’ ; मनोज जरागेंचं काळीज चर्रर करणारं विधान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, मराठा आरक्षणाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज एका निवेदनाद्वारे जारी केले. त्यात त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण द्यावं, असं आवाहन केलं.
ठाकरेंनी निवदेनात लिहिलं की, मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, असं ठाकरे म्हणाले.
जरांगे-पाटील उपोषणाला करत आहे. पण, आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या् मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण, त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
अद्याप आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. राजकीय नेत्यांना घेरण्याचं काम समाज बांधव करत आहे. परिस्थिती चिघळत चालली आहे. तर काही मराठा समाजातील नेत्यांना आरक्षणला समर्थन देत सरकारला कोडींत पकडालया सुरूवात केली. त्यामुळं सरकारने उद्या मराठा आरक्षण व सुविधासाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.