‘यापुढं माझ्या कुटुंबाला माझ्यासोर आणू नका, कारण…’ ; मनोज जरागेंचं काळीज चर्रर करणारं विधान
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नहाी. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबियांना आंदोलनस्थळी आणले. मात्र, यानंतर जरांगे पाटील संतप्त झालेले दिसले. माझ्या कुटुंबाला माझ्यासमोर आणू नका, असे स्पष्ट शब्दात त्यांनी उपस्थितांना सांगितलं.
जरांगेची तब्येत खालावली असून त्यांनी वैद्यकीय सेवाही नाकारल्या आहेत. त्यांच्या पोटात दुखू लागलं. तरीही ते उपोषण करत आहे. बोलतांना त्यांना धाप लागत आहे. त त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांचं कुटुंब आंदोलनस्थळी आलं आहे. यावरू जरांगे पाटील संतापले होते. ते म्हणाले, प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं. तसंच माझंही आहे. मात्र आंदोलन करताना मी कुटुंबाचा नसतो, तर मराठा समाजाचा असतो. यापुढं माझ्या कुटुंबाला माझ्यासमोर आणू नका. कारण प्रत्येकाला आपली लेकरं, माय-बाप पाहिल्यावर माया येते. त्यामुळं त्याच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.
ते म्हणाले की, आपलं कुटुंब पाहिल्यावर हुंदका दाटून येतो. त्यामुळे दोन दिवस जास्त उपोषण करायचं असेल तर ते होत नाही. म्हणून मी खवळलो. तुमच्यावर रागवायला मी मूर्ख नाही. जर कोणालाही आपलं कुटुंब समोर दिसलं तर हुंदका भरून येतो आणि माणूस दोन पावलं मागं येत असतो. याचा विचार करा, असं जरांगे म्हणाले.
पुढं ते म्हणाले, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि माझ्या समाजावरही माझं प्रेम आहे. पण, मी एकदा आंदोलनावर बसलो की घरच्यांना मानत नाही. मी प्रथम समाजाला मानतो. मी आधी समाजाचा आणि मग कुटुंबाचा आहे. त्यामुळं माझं कुटुंब अशावेळी येत नाही. याआधी ते कधीही आलं नाही. पण, आता कुटुंब येत आहे. कुटुंबानेही येऊ नये. मी पहिल्या समाजाचा आहे. जगलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा आहे, असंही जरांगेंनी सांगितलं.
सरकारला उपोषणाशिवाय जागच येत नाही
यावेळी त्यांची मुलगी पल्लवी म्हणाली की, आमच्या कुटुंबाची घालमेल वाढली आहे. कारण पप्पांना उपोषण करावं, अशी त्यांची अवस्था नाही. मागच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं होत की, त्यांनी उपोषण करू नये, पण सरकारला उपोषणाशिवाय जागच येत नाही. त्यामुळं दु:ख होतंय आणि पप्पांना उपोषण करावं लागतं.