Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या विखेंविरोधात घोषणाबाजी, विखेंनेही लगावला टोला
अहमदनगरः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे (Maratha Reservation/strong>)आता याची धग नगर जिल्ह्यात देखील दिसू लागली आहे. यातच पुढाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनना गावबंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे गेले होते. त्यावेळी काही आंदोलकांच्या घोषणांना विखेंना सामोरे जावे लागले. विखे पाटील परत जा, परत जा, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांकडून विखेंना विरोध करण्यात आला. दरम्यान यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलक करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळ गोंधळ उडाला होता. त्यानंतरही विखे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची चर्चा केली.
Maratha Reservation : उद्या शिंदे समितीची बैठक; टिकणारच आरक्षण देण्याची भूमिका, देसाईंनी सांगितलं
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत आश्वासन देण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. लोकप्रतिनिधी तसेच आमदार खासदार यांना गावबंदी घालण्यात आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गावात बंदी असे बॅनर देखील झळकले आहे.
मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!
जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी साखळी आंदोलने उपोषणे सुरू आहे. राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संगमनेरमध्ये देखील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात बाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे.
या साखळी उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थींना भेट देण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी संगमनेरमध्ये आले होते. मंत्री विखे पाटील उपोषणस्थळी येताच काही तरुणांनी त्यांना भेटीसाठी विरोध करत विखे पाटील परत जा अशा घोषणा दिल्या आहेत.
तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते ?
विखे पाटील म्हणाले, अशी आंदोलन ही स्वाभाविक आहे. परंतु काही वेळापूर्वी काँग्रेसचे नेते येथे येवून गेले तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते? एकाच पक्षाच्या लोकांना गावबंदी करणाऱ्यांची भूमिकाही यातून उघड झाल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.