Maratha Reservation : उद्या शिंदे समितीची बैठक; टिकणारच आरक्षण देण्याची भूमिका, देसाईंनी सांगितलं
Shambhuraj Desai On Maratha Reservation : उद्या मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीची बैठक असून आमची मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विधान मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सरकारची भूमिका शंभूराज देसाईंनी मांडली आहे.
‘मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालतो’; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितल्या पेहरावाबद्दलच्या गोष्टी
शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचं वेगाने काम सुरु असून उद्या समितीतील सर्वच सदस्यांना मुंबईत बोलवलं आहे. आरक्षणासंदर्भात उद्या महत्वाची बैठक पार पडणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.
Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंना फक्त ‘दोनवेळा’ भेटलोय, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
तसेच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या अध्यक्षांना आज भेटण्यासाठी वेळही मागितली आहे. मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांना औषधोपचार घ्यावेत, काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे यांच्याबाबत आपुलकी आदर असल्याचंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वीही हमास संघटनेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानशी…; कुमार केतकरांचा मोठा दावा
सध्या सुरु असलेल्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारचं कोणतंही उत्तर मिळालं नाही अथवा संवाद नाही. 30-31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. सरकारने आमच्या लेकराबाळांचा विचार करावा. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. मी आधी माझ्या समाजाचा आहे नंतर कुटुंबाचा आहे. सरकारने वेळ वाया न घालवता तत्काळ आरक्षण द्यावं. आपल्याला आरक्षण मिळणार आहे तेव्हा गडबड करू नका असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही बंद पडेल :
कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच असल्याचं ते म्हणाले आहेत. चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे.