मराठा आरक्षणासाठी माझा फॉर्म्युला ऐका, अन्यथा शिंदे सरकार कोसळणार; बड्या नेत्याची भविष्यवाणी
Haribhau Rathod On Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange</a>)यांची प्रकृती खालावली आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांना अडविण्यात येत आहे. वाहने फोडण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल, याचा एक फॉर्म्युलाही राठोड यांनी सांगितला आहे.
यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले; निश्चित मराठा समाजाचा प्रश्न जठील झाला आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण पेटले आहे. यावर सरकारचे लक्ष नाही असे नाही. सरकारकडे उपाययोजना नाहीत. सरकारकडून तज्ज्ञ माणसे नाहीत. सरकारकडे अभ्यासू व्यक्ती नाहीत. सरकारकडे चांगले वकील नाहीत.
Manoj Jarange : मनोज जरागेंचं सरकारला आवाहन म्हणाले, आता सरकारने…
मी साधा फॉर्म्युला सांगितले आहे की मराठा समाजाला 50 टक्क्यांमधून आरक्षण देता येते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येते. मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण देता येऊ शकते. मराठा म्हणून आरक्षण म्हणून देता येईल. हे मी वारंवार म्हणून सांगत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार देऊऊ सांगतो, मंडल आयोगाला आव्हान देण्यात आले होते. ११ न्यायाधीशांनी निर्णयाने दिला आहे. जर एखादे सरकार ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाची वर्गवारी करू शकतो. त्यावेळी आरक्षण वैध ठरते.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना राज्यात त्यावेळी चौदा टक्के आरक्षण होते. दहा टक्के ओबीसी आणि चार टक्के भटक्यांना आरक्षण होते. शरद पवारांना धनगर, वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घ्यायचे होते. १९९४ शरद पवार मला बैठकीला बोलवून निर्णय घेऊन याबाबत विचारले होते. आरक्षणाची ए, बी, सी, डी अशी वर्गवारी केली तर ते संवैधानिक आहे. या पध्दतीने आरक्षण दिल्यास मनोज जरांगेचे उपोषण सुटेल. यात कुणाचेही नुकसान होणार नाही. परंतु आरक्षणाचा निर्णय न झाल्या राज्य सरकार कोसळेल, असा दावाही हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.