Maratha Reservation : केसरकर, विखे पाटील, महाजनांचे फ्लेक्स फाडले; नेत्यांविरोधात रोष वाढला

Maratha Reservation : केसरकर, विखे पाटील, महाजनांचे फ्लेक्स फाडले; नेत्यांविरोधात रोष वाढला

अहमदनगर : मराठा समाजाने राजकीय नेत्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा पुढचा अंक आज (29 ऑक्टोबर) अहमदनगरमध्येही पाहायला मिळाला. एका कार्यक्रमाच्या बोर्डावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते. हे फोटो मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने कार्यक्रमास्थळी जाऊन काढून टाकण्यात आले. यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला होता. (Photos of ministers Deepak Kesarkar, Radhakrishna Vikhe Patil and Girish Mahajan torn by Maratha reservation protesters)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. 17 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, या काळात आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचवेळी सकल मराठा समाज बांधवही चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे.

Devendra Fadnavis : फडणवीस CM, त्यात चुकीचं काय? शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

या गावबंदीचा मागील काही दिवसांत केंद्रीय मंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार प्रताप चिखलीकर पाटील चिखलीकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार अशोक चव्हाण, माजी मंत्री रामदास कदम, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री बदामराव पंडीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अशा सर्वपक्षीय नेत्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता अहमदनगरमध्येही केसरकर, विखे पाटील आणि महाजन या तीन मंत्र्यांना विरोध करण्यात आला.

आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला नो एन्ट्री, पूजेला आल्यास काळे फासू; मराठा समाजाचा इशारा

नेमका काय प्रकार घडला?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या बोर्डवरदीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र सध्या राज्यामध्ये आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला असून सर्व नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमधील संतप्त सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमस्थळी जाऊन हा फ्लेक्स काढून टाकण्यात आला. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी अहमदनगर दौरा रद्द केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube