मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय, मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राजकारण तापले आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु केल्यापासून मराठा आंदोलकांनी सर्वच नेत्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय, असं त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केलं असे लोक मला टार्गेट करतात. त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे याला टार्गेट करा अशी त्यांची मानसिकता दिसते, असे ते म्हणाले.
शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, पवारांचे आमदार अपात्र ठरणार?
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मराठा समाजाच्या नावाने ज्या नेत्यांनी राजकारण केलं त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मी दिलं होतं. आजवर मराठा समाजासाठी जे लोक काहीही करु शकले नाहीत अशाच लोकांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मी माझी जात बदलू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी ब्राह्मण आहे. मी जात बदलण्याचं कारण नाही. मात्र मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं त्यांनी वाटंत की मी सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं असं त्यांनी म्हटलं आहे.
शरद पौर्णिमेदिवशी चंद्राचे प्रतिबिंब दुधात पडण्याला इतके महत्त्व का? जाणून घ्या सविस्तर…
मी जे केलं आहे ते लोकांच्या समोर आहे. 1980 ते 20217 ही 37 वर्षे मराठा सामाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा नाकर्तेपणाही समोर आला आहे. त्यामुळे ते अधिक आक्रमकतेने मला टार्गेट करण्यासाठी एकत्र येतात. मला कितीही टार्गेट केलं तरीही सामान्या मराठा माणसाला माहीत आहे. मी जातीचं कार्ड कधीही खेळत नाही. पण मला टार्गेट करणाऱ्यांच्या मानसिकता सांगते आहे. सामन्य माणसाच्या मनात जात नसते. त्यांच्या कर्तृत्व असतं. तुम्ही काय काम करता यावर ते तुमचं महत्व ठरवत असतात. त्यामुळे काही काळासाठई तुम्ही लोकांची दिशाभूल करु शकता. मला टार्गेट करु शकता पण हे फार काळ टिकत नाही. शिवाय लोक हे त्यांना विचारु शकतात की तुम्ही काय केलंत? असंही फडणवीस म्हणाले.