Maratha reservation : संभाजीराजेंचा अन् समाजाचा राखला मान, जरागेंनी घेतला पाण्याचा घोट

  • Written By: Published:
Maratha reservation : संभाजीराजेंचा अन् समाजाचा राखला मान, जरागेंनी घेतला पाण्याचा घोट

Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जलत्याग केला होता. मात्र, समाजबांधवांनी केलेल्या आग्रहानंतर त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला.

Maratha reservation : संभाजीराजेंचा अन् समाजाचा राखला मान, जरागेंनी घेतला पाण्याचा घोट 

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, मराठा आरक्षणाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अन्न आणि जलत्याग केल्यानं त्यांची तब्येत खालावली. त्यांच्या पोटात दुखू लागलं. पण, तरीही जरांगे उपोषण करत आहेत. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला. बोलतांना त्यांना धाप लागत आहे. मराठा समाजात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळं आज संभाजीराजेंनी त्यांनी पाणी पिऊन आंदोलन करावे, अशी विंनती केली.

अंतरवली सराटीत जमलेल्या आंदोलकांनीही त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. दादा, आमची एकच विनंती आहे. फक्त पाणी घ्या…आम्हाला आरक्षण नको. आपल्या मनगटात ताकद आहे. आम्ही लढू शकतो. फक्त दादा, पाणी घ्या, अशी विनंती आंदोलकांना केली. एका अंध कार्यकरत्यांनी तर ढसाढसा रडून पाणी पिण्याची विनंती केली. त्यानंतर सर्वांचा मान राखत जरांगे पाटलांनी पाण्याचा घोट घेतला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मी तुमच्या विनंतीचा आदर करतो. मी पाण्याचा घोट घेतो. पण मी माझ्या उपोषणावर ठाम राहीन. उपोषण सुरूच राहणार आहे. यानंतर त्यांना पाणी देण्यात आले. जरांगे पाटील हे पाच दिवसांनी एक घोट पाणी प्यायले.

लाख मेले तरी चालतील
पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या… अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असं लिहिलेली पोस्टर्सही झळकवण्यात आली. जरांगे पाटलांना काही झाले तर नेत्यांना कायमची जिल्ह्याबंदी करू, असा इशाराही देण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube