Maratha Reservation : ‘…नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’; जाळपोळीवरुन जरांगेंचा कडक इशारा
Maratha Reservation : मला जाळपोळीच्या घटनांची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचा आजचा सहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन जरांगे पाटलांनी हे विधान केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, कोट्यवधी असलेला मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जे लोकं हिंसाचार करत आहेत ते मराठा समाजातील नाहीत. जाळपोळ करु नका, हिंसा करु नका. हे कोण करतंय याची मला शंका येत आहे. मला कुठेही जाळपोळ व्हायची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना दिला आहे.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन
तसेच जोळपोळीच्या घटनेचे मी कधीही समर्थन करत नसून सध्या जी जाळपोळ सुरु आहे, ती तात्काळ थांबवावी. नाहीतर मला नाईलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. गोरगरिब मराठ्यांना हे अपेक्षित नाही. मी चौकशी करणार आहे की, हिंसक आंदोलन कोण करत आहे. बहुतेक मला शंका आहे की सत्ताधारी नेतेच स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या हाताने आपली घरं जाळून घेत आहेत. मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील
उपोषणाच्या सहाव्या दिवशी आज महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे यांना फोन आला होता. ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण आणि प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेतो. तसेच त्यांनी सांगितलं की, ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण आम्ही त्यासाठी तयार नाहीत.
मात्र, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला ते मान्य नाही. तसं केल तर हे आंदोलन आणखी तीव्र करू. असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तर विखे पाटलांनी सांगितलं आहे की, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम अहवाल स्विरकारला आहे. त्यामुळे ते बैठक बोलावत आहेत.