Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील

  • Written By: Published:
Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत आहे का? – विखे पाटील

अहमदनगर : मराठा समाजाला अद्याप आरक्षण ( Maratha Reservation) मिळलं नाही. त्यामुळं विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांना चांगलचं सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. परंत, या प्रश्नाचे भांडवल करू राजकारण करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तरी आरक्षणाच्या बाबतीत एकमत आहे काॽ असा सवाल विखे पाटलांनी केला.

मराठा समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षण ठेवणार का? ठाकरेंचा संतप्त सवाल 

संगमनेर येथे मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. संगमनेरमध्ये उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट मंत्री विखे पाटील यांनी घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत सरकारची असलेली भूमिका स्पष्ट केली. शासन मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांसाठी करीत असलेल्या उपाय योजनांची सविस्तर माहीती त्यांनी उपोषणकर्त्यांना दिली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर उद्याच मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक बोलाविण्यात आली. सारथी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात येत असून याचाही लाभ जास्त विद्यार्थ्यांना मिळाला, यासाठी संख्येमध्ये वाढ करण्यात आली. वसतिगृहाच्या बाबतीतही सरकारने निर्णयात बदल केल्याचं ते म्हणाले.

यावेळी बोलतांनी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली. ते म्हणाले की, यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, ते आरक्षण महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणाने गेले. तेच महाविकास आघाडीचे नेते आता आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण करीत असल्याचा आरोप करून विखेंनी केला.

शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आरक्षणावर बोलत नाही. यापूर्वी त्यांच्या मुखपत्राने ५८ मोर्चाची कशी अवहेलना केली हे समाज जाणून आहे. काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष आरक्षणाच्या बाबतीत मांडत असलेल्या भूमिकेच्या विरोधात विरोधी पक्षनेते बोलतात. तर काँग्रेसचे इतर नेते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ राजकीय पोळी भाजून घेत असल्याची टिका विखे-पाटलांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चारवेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी काय केले हे एकदा तरी त्यांनी सांगितलं पाहिजे, अशी टीकाही त्यांना शरद पवारांवर केली.

तेव्हा हे कार्यकर्ते कुठं गेले?
आज संगमनेरमध्ये मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी विखे-पाटील गेले असतात आंदोलकांनी विखे पाटील परत जा, परज जा, अशी घोषणा दिल्या. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, अशी आंदोलनं ही स्वाभाविक आहेत. परंतू काही वेळापूर्वी काँग्रेस नेते येथे येवून गेले, तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते? एकाच पक्षाच्या लोकांना गावबंदी करणाऱ्यांची भूमिकाही यातून उघड झाल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube