Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही आंदोलन पेटले आहे. त्यामुळे हिंसक घटना टाळण्याच्या उद्देशाने प्रशासनाने या जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काल दिवसभरात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. बीडमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्या पाठोपाठ धाराशिवमध्येही हिंसक वळण लागले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Maratha reservation : जाळपोळीचं लोन आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

बीडमध्ये आमदारचे घर अन् कार्यालय जाळले 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आली. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली. या परिस्थिती जिल्हा प्रशासनाने येथे तत्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही आंदोलन चिघळले होते. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या वाहनावर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले.

Maratha Reservation : सरकारच्या हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत आहेत.

40 दिवसांची मुदत दिल्यानंतर अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आरक्षणावरून राज्याच्या कानोकोपऱ्यात वातावरण तापलं आहे. सध्या मराठा आंदोलननाने उग्र स्वरुप धारणं केलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज