एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस
Sachin Pilot Divorced: दोन राजकीय मातब्बर घराण्यातील आणि जाती-धर्माच्या भिंती तोडणाऱ्या एका लव्हस्टोरीचा तब्बल वीस वर्षानंतर द एन्ड झाला आहे. राजस्थानचे काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सारा (Sara Pilot) घटस्फोट झाला आहे. या दोघांचा घटस्फोट झाल्याचे पहिल्यांदाच पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघडकीस आले आहे.
Maratha Reservation साठी अभिनेत्री मैदानात; आता नाही तर कधीच नाही, लढ्याचा भाग होणे माझे कर्तव्य
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला हे विदेशात शिक्षण घेत असताना प्रेमात पडले होते. या दोघांच्या लग्नाला दोन्ही घरातून तीव्र विरोध होता. त्यानंतरही दोघेही 2004 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. सचिन पायलट यांनी राजस्थानमधील टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात पत्नीची नाव न टाकता घटस्फोटीत असा उल्लेख केला आहे. या दोघांना दोन मुले आहेत. अरण आणि विवान असे दोन्ही मुलांचे नावे आहेत. हे मुले सचिन पायलट यांच्याकडे राहत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मोठी बातमी : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; शिंदे सरकारचा निर्णय
गेल्या काही वर्षांपासून दोघे वेगळे झाल्याची चर्चा होती. परंतु या चर्चा पायलट यांनी खोडून काढल्या होत्या. सचिन पायलट यांनी 2018 मध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी सारा पायलट, त्यांचे मुले, सासरे फारुक अब्दुल्ला हेही उपस्थित होते. त्यानंतर या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्रातून दोघांचा घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे.
सचिन पायलटकडे कार नाही; सात कोटींची संपत्ती
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता अशी 7 कोटी 12 लाख रुपयांची संपत्ती आहे. परंतु त्यांच्याकडे एकही कार नाही, असे निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दहा ग्रॉमची सोन्याची चेन, चार ग्रॅमची सोन्याची अंगठी आहे. पायलट यांच्याकडे कर्ज नाही. त्यांनी 1 कोटी 26 लाख रुपये उधार घेतलेले आहे. सचिन पायलट यांच्याकडे 2018 मध्ये 6 कोटी 43 लाख इतकी संपत्ती होती.