Sachin Pilot : वडिलांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट घेणार आक्रमक भूमिका? समोर आली मोठी माहिती

Sachin Pilot : वडिलांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट घेणार आक्रमक भूमिका? समोर आली मोठी माहिती

Sachin Pilot :

राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर वडिल दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट मोठी घोषणा करतील असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकीय विश्वात लावला जात होता. राजेश पायलट यांची पुण्यतिथी (11 जून) जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वर्तुळात ही चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. दरम्यान, आता पायलट यांच्या जवळच्या सूत्रांकडून या प्रकरणाची विशेष माहिती समोर आली आहे. (Congres leader sachin pilot will not announce new party on his father late rajesh pilot death anniversary)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी वेगळी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचा पराभव होऊ शकतो, असा दावा विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीही आडाखेही बांधले जात आहेत. दरम्यान, राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. सचिन पायलट नवा पक्ष काढणार आहेत, या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, पायलट यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांचा पक्ष सोडण्याचा किंवा नवीन पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही. पायलट हे सध्या हायकमांडच्या निर्देशांची वाट पाहणार आहेत. सचिन पायलट 11 जून रोजी दौसा येथे जाऊन वडील राजेश पायलट यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Indian Post Recruitment 2023 : दहावी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 15 हजार पदांची मेगा भरती, पगार 24, 400 रुपये

पायलट यांनी नवा पक्ष काढण्याच्या चर्चेवर रंधावा काय म्हणाले?

पत्रकारांशी संवाद साधताना राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले, सचिन पायलट हे आपला नवा पक्ष काढणार आहेत, हे मी फक्त तुमच्याकडूनच ऐकत आहे. मला वाटतं पायलट असं काही करणार नाहीत. यापूर्वीही आपण कधी एखादा पक्ष काढावा, असं त्यांना वाटलं नाही. आता देखील पक्ष काढण्याची त्यांची इच्छा नाही. आता मी मंत्री आणि आमदारांची स्वतंत्र बैठक घेणार आहे.

पायलट आणि गेहलोत यांच्याशी चर्चा झाली -रंधवा

रंधावा म्हणाले की, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट दिल्लीत राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि खर्गे यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांचं म्हणणं हायकमांडने ऐकून घेतलं. दरम्यान, आता काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीनंतर पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत असलं तरी सचिन पायलट नेमका काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube