Indian Post Recruitment 2023 : दहावी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 15 हजार पदांची मेगा भरती, पगार 24, 400 रुपये
Indian Postal Department Latest Recruitment 2023 : आजचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे आज अनेकांसमोरचं मोठं मोठं चॅलेंज आहे. कारण दिवसेंदिवस देशात बेरोजगारांची ( unemployed) संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि दहावी उत्तीर्ण असाल तर एक खुशखबर आहे महाराष्ट्र टपाल विभागाने तब्बल हजारो विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. (mega recruitment of 15 thousand posts in Indian Post Department, 10th passed candidate can apply)
या भरतीअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या 15 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. टपाल विभागाच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे
माजी आमदार Ramesh Kadam यांना 6 वर्षांनंतर जामीन, अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होते अटकेत.
या भरतीसाठी अर्ज करतांना उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण अर्ज करतांना काही त्रुटी झाल्यास अर्ज रद्द होईल, याची नोंद घ्यावी.
एकूण पदे – 15 हजार
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पदांचा तपशील –
1. शाखा पोस्ट मास्तर
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर
3. डाक सेवक
शैक्षणिक पात्रता –
भारत सरकार/ राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10 वी पास झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महत्वाचं म्हणजे, 10 वी पर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा-
18 ते 40 वर्षादरम्यान
अर्जाची पध्दत – ऑनलाईन
पगार –
शाखा पोस्ट मास्टर – 12 हजार ते 29 हजार 380 रुपये
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक – 10 हजार ते 24 हजार 470 रुपये
जाहिरात – https://drive.google.com/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ – https://www.indiapost.gov.in/