आम्ही जाऊन आणखी बिघाड… म्हणून मविआशी समझोता तुटला; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

आम्ही जाऊन आणखी बिघाड… म्हणून मविआशी समझोता तुटला; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपण महाविकास आघाडीशी झालेला समझोता का तोडला? यावर आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले. ते आज ( 31 मार्च ) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

…म्हणून मविआशी समझोता तुटला

यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीसोबत चर्चा करत होतो. मात्र त्यांच्यातच एक वाक्यता नाही. हेही मी वेळोवेळी सांगितले आहे. ते आता स्पष्ट झालं आहे. कारण त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. त्यामुळे आम्ही अशी भूमिका घेतली आहे की, आधी तुमचं भांडण मिटवा, पण त्यांचं भांडण काही मिटताना दिसत नाही, त्यांच्यातच समझोता होत नाही, मग त्यात आम्ही जाऊन आणखी बिघाड करण्यापेक्षा आम्ही आमची स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Baramati Lok Sabha : भाजपनं आमचं घर फोडलं अन्.. सु्प्रिया सुळेंची घणाघाती टीका

आंबेडकरांनी सांगितलं, आम्ही काँग्रेस अध्यक्षनांही पत्र लिहिलं होतं. सात जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. काही सामाजिक राजकीय स्थिती निर्माण झाली. एकाच विचारांची माणसे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. समझोता होत आहेत आणि जिथे होत नाही अशा ठिकाणी सुद्धा समोरासमोर आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. असेही आंबेडकरांनी सांगितलं.

Amruta Khanvilkar च्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ; लुटेरेतील अभिनयाचं केलं कौतुक!

दरम्यान या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी म्हणाले कालचं वक्तव्य संजय राऊत यांचं होतं. संजय राऊत आणि महाविकास आघाडी वेगवेगळ्या आहेत. महाविकास आघाडी सोबतही चर्चा बंद झालेली नाही. असं ही म्हटलं होतं. यामुळे वंचितच्या भूमिकाबेद्दल सस्पेन्स वाढला होता. मात्र आता त्यांनी मविआतून बाहेर पडल्याचं सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज