Baramati Lok Sabha : भाजपनं आमचं घर फोडलं अन्.. सु्प्रिया सुळेंची घणाघाती टीका

Baramati Lok Sabha : भाजपनं आमचं घर फोडलं अन्.. सु्प्रिया सुळेंची घणाघाती टीका

Supriya Sule Criticized BJP : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना (Supriya Sule) उमेदवारी जाहीर केल्यानंतर अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना (Suntera Pawar) उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बारामतीत आता पवार कुटुंबातच सामना होणार आहे. यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षावर (BJP) घणाघाती टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीने मला पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आता या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या अशी विनंती मी करत आहे. भाजप नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला या निवडणुकीत शरद पवारांना हरवायचं आहे. त्यांना विकास करायचा नाही. त्यांच्याकडे उमेदवार नाही. आमची माऊली, मोठी वहिनी आईसमान असते. माझ्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार मोठ्या भावाची पत्नी आईसमान असते. आमच्या आईला भाजपाने निवडणुकीत आणलं आहे याचा विचार करा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : “दमदाटी केली तर गाठ माझ्याशी” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला खणखणीत इशारा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात आली आहे.भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत.

शरद पवार गटाकडून पाच जणांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तटकरे यांनी केवळ ही एकच उमेदवारी घोषित केली. यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.

Ahmednagar Lok Sabha : लंकेंच्या पाठिशी थोरात; विखेंविरोधात संगमनेरात मध्यरात्री खलबतं

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज