Amruta Khanvilkar च्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ; लुटेरेतील अभिनयाचं केलं कौतुक!

Amruta Khanvilkar साठी 2024 ठरतयं खास; नव्या शोमध्ये झाकीर खानसोबत दिसणार

Amruta Khanvilkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची. अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. “लुटेरे” सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने “अविका ” ही भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

Ahmednagar Lok Sabha : लंकेंच्या पाठिशी थोरात; विखेंविरोधात संगमनेरात खलबतं

आता तिच्या अभिनयाची भुरळ चक्क कॉमेडियन-अभिनेता झाकीर खान याला देखील पडली आहे. झाकीरने नुकताच तिचा वेब शो बघून सोशल मीडियावरून तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. झाकीरने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करून म्हटलं “लुटेरे” सारखा शो बघण उत्कंठावर्धक आहे. आणि आता शिपमध्ये सोडा जहाजात बसण्याआधी होडीत बसण्यासाठी सुद्धा 10 वेळा विचार करेन! माझी आवडती “अमृता खानविलकर” हिने शो मध्ये कमाल केली.

https://www.instagram.com/stories/zakirkhan_208/3335661145394052286/

चाहत्यांना रोमाचंक अनुभव देण्यास Tamanna Bhatia सज्ज! अरनमानाई 4 चा ट्रेलर आऊट…

लुटेरे साठी अमृताला अनेक कमालीच्या प्रतिक्रिया मिळत असताना आज झाकीर ने तिचं कौतुक करणं देखील तितकच खास आहे. लुटेरे मधून अमृताने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आता पुढे अमृता काय करणार ? याकडे सर्वांच लक्ष आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक बड्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार यात शंका नाही.

follow us